Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारे चोरटे गजाआड

जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारे चोरटे गजाआड

डेक्कन पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती प्रभात रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलेला अडवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोघा चोरट्यांना डेक्कन पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. त्यांच्याकडून मंगळसूत्र आणि गुन्ह्यातील दुचाकी जप्त केली आहे. जुल्फुकार वहीद शाह (वय ४०, रा. खराडी) आणि नसीम यामीन अन्सारी (वय ४२, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

घरात चोरी करणार्‍या केअर टेकरला अटक – सविस्तर बातमी

रात ६४ वर्षांच्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी १२ ऑक्टोबरला हिसकावून नेले होते. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडून दुचाकीस्वार चोरट्यांचा माग काढला जात होता. उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अजय भोसले यांनी तांत्रिक तपास केला. पोलीस अंमलदार वसीम सिद्दीकी, संजय दंडगुले, संतोष सागर यांच्या माहितीच्या आधारे तपास पथकाने संशयितांवर लक्ष देत त्यांचा माग शोधून काढले.

पसार झालेल्या दोन चोरट्यांना डेक्कन पोलिसांनी २४ तासांच्या आत पकडण्यात यश मिळवले आहे. दोघांकडून हिऱ्याचे पेंडंट असलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त केली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले, एसीपी साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अजय भोसले, अंमलदार दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर, वसीम सिद्दीकी, सागर घाडगे, संजय दंडगुले, संतोष सागर गणेश सातव यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×