Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

पोलीस असल्याची बतावणीने जेष्ठाचे दागिने लंपास

भरदिवसा सराफाची दागिन्याची बॅग पळवली

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडील दोन लाख ९० हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना बाणेर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर वाढदिवस; दोघांकडून महिलेला शिवीगाळ – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे बाणेर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. मंगळवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी सातच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे घरातून फिरायला निघाले. पॅनक्लब रस्त्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. ‘ आम्ही पोलीस आहोत. या भागात चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांना पकडण्यासाठी आम्ही गस्त घालत आहोत’, अशी बतावणी चोरट्यांनी ज्येष्ठ नागिरकाकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवले. त्यांच्याकडील दोन लाख ९० हजार रुपयांची सोनसाखळी काढून ठेवण्यास सांगितले. सोनसाखळी कागदात गुंडाळून देण्याचा बहाणा करुन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडील सोनसाखळी लांबवली. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.

सोनसाखळी चोरल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पॅनकार्ड क्लब रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×