स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर वाढदिवस साजरा करणाऱ्या दोघांना रहिवासी महिलेने जाब विचारल्याने तिला शिवीगाळ करण्यात आल्याची घटना स्वारगेट भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.अरुण विठ्ठल पवार (वय ३८, रा. शालोम सोसायटी, पौर्णिमा टाॅवरजवळ, स्वारगेट) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
केजमध्ये कोरडेवाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण : ५ बसेसवर दगडफेक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शंकरशेठ रस्त्यावरील शालोम सोसायटीत राहायला आहे. आरोपी पवार याच सोसायटीत राहायला आहे. १३ ऑक्टोबर रोजी आरोपी पवार आणि त्याचा मित्र सोसायटीच्या प्रवेश द्वारासमोर दारू पित होते. वाढदिवस साजरा करताना त्यांनी केक कापला. आरडाओरडा ऐकून महिलेने पवार आणि त्याच्यााबरोबर असलेल्या मित्राला जाब विचारला. या कारणावरुन पवारने महिलेला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. पोलीस उपनिरीक्षक शिरसाट तपास करत आहेत.
कोथरूडमधील मयूर काॅलनीत एका सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याने सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ केल्याची घटना नुकतीच घडली. सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करुन टोळक्याने धक्काबुक्की केली होती.




















