बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – हातऊसने घेतलेले पैसे परत मागितल्याने एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भिडे पूल परिसरात फलक लावण्याची मागणी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा महिलेच्या ओळखीचा आहे. मार्च महिन्यात त्याने महिलेकडून सहा लाख रुपये हातऊसने घेतले होते. पैसे लवकर परत करतो, असे त्याने महिलेला सांगितले होते. महिलेने त्याच्याकडे पैसे परत मागितले. आरोपीने महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोरे तपास करत आहेत.






















