Breking News
पुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजन

इंधन वाहतूक करणार्‍या टँकरला आग

शेवाळेवाडी चौकातील घटना

marathinews24.com

पुणे – पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणार्‍या टँकरला आग लागल्याची घटना सोमवारी दि. १० सकाळी सव्वा नउच्या सुमारास हडपसरनजीक शेवाळेवाडी चौकात घडली. त्यावेळी अग्निशमन दलाने घटनानस्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा धोका टळला असून, इंधनाला आग लागून होणारे संभाव्य नुकसान टळले आहे.

पिस्तूल बाळगणारे सराईत अटकेत – सविस्तर बातमी

शेवाळेवाडी चौकामध्ये पेट्रोल टँकरला आग लागल्याची वर्दि अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार हडपसर, काळेपडल, बी टी कवडे रोड आणि खराडी अग्निशमन केंद्र वॉटर टँकर रवाना करण्यात आले. घटनास्थळी जवानांनी पाहणी केली असता, टँकर अगदी चौकामध्ये रस्त्यावर केबिनने पेट घेतल्यान धोका निर्माण आहे. जवानांनी तत्पर आगीवर पाण्याचा मारा करीत आग टँकमधील पेट्रोल व डिझेलला लागणार नाही याची खबरदारी घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचल्याने व जवानांनी बजावलेले कर्तव्यामुळेच मोठा धोका टळला.

आग लागल्यानंतर टँकर चालक घाबरल्याने वाहनातून उडी मारून बाहेर पडल्याने बचावला. टँकरमध्ये १५ हजार लिटर डिझेल आणि ५ हजार लिटर पेट्रोलसाठा होता. टँकर चालक इंधन घेउन लोणी येथून जात होता. कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, निलेश लोणकर व वाहचालक नारायण जगताप, राजू शेख आणि तांडेल शौकत शेख तसेच फायरमन बाबा चव्हाण, चंद्रकांत नवले, रामदास लाड, अविनाश ढाकणे या जवानांनी सहभाग घेतला. अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचत जवानांनी दाखवलेली सतर्कता यामुळे मोठी हानी टळली अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असे मुख्य अग्निशमक अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×