Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

सराईत टिपू पठाणसह टोळीविरूद्ध आणखी एक मोक्का

काळेपडळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील काळेपडळ परिसरात दहशत निर्माण करणार्‍या सराईत रिजवान ऊर्फ टिपू पठाण आणि साथीदारांविरूद्ध आणखी एक मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पठाणविरूद्ध आतापर्यंत तब्बल २५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत अशा गुन्हेगारी प्रकरणांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित टोळीला मोक्काचा दणका दिला आहे.

पादचारी ज्येष्ठाची सोनसाखळी हिसकावली – सविस्तर बातमी

सराईत रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण याच्याविरूध्द खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत व गर्दी मारामारीचे तब्बल २५ गुन्हे दाखल आहेत. पठाण व त्याच्या साथीदारांनी २०२० पासुन तक्रारदाराच्या शेडचे नुकसान केले आहे. हडपसर स. नं. ७५/७/८ सय्यदनगर, गल्ली नं. २, गायकवाड सोसायटीमधील क्षेत्र १ हजार २९० चौरस फुट जागेवरील शेड टोळीने तोडले. त्यानंतर नवीन पत्र्याचे शेड उभारुन तिर्‍हाईत ग्राहकांना भाड्याने देवून मोठ्या प्रमाणात मोबदला स्वीकारला आहे. प्लॉट हा खाली करणार नसाल तर त्यामोबदल्यात २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी करुन टोळीने तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

गुन्हेगारी वर्चस्व राखण्यासह दहशतीसाठी पठाण आणि साथीदारांनी संघटितरित्या गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरुध्द मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यावतीने अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना सादर केला. त्यानुसार सराईत पठाण टोळीविरूद्ध पुन्हा मोक्का कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, एपीआय अजय हंचाटे, उपनिरीक्षक विनायक गुरव, राजेंद्र वाघमारे, बिपीन सुर्यवंशी, हनुमंत कांबळे, प्रतिक लाहिगुडे, प्रविण काळभोर, दादासो नाळे, निलेश परदेशी, शाहीद शेख, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×