Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

ओतूर परिसरातील सात वर्षीय बालिकेवरील अमानुष अत्याचार

Dr Neelam Gorhe Congress Statement

अल्पवयीनांच्या सुरक्षेबाबत अधिक संवेदनशील होणे गरजेचे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील ओतूर (ता. जुन्नर) येथील स्थानिक गरीब शेतकरी कुटुंबातील ७ वर्षीय निरागस बालिकेवर १६ नोव्हेंबरला अत्यंत अमानुष लैंगिक अत्याचार झाला होता. त्यापार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने दखल घेत पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला आहे.

कॅम्पमध्ये पेट्रोपपंपावर राडा घालणार्‍यांना अटक – सविस्तर बातमी

आरोपी हा ऊसतोड मुकादमाचा मेहुणा असून संबंधित मुकादम मागील १० वर्षांपेक्षा अधिक काळ त्या परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वीदेखील आरोपीने पीडितेच्या मोठ्या बहिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक तपास समोर आला आहे. गुन्ह्यानंतर आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तत्काळ अटक करून पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवला आहे. पिडीत बालिका सध्या गंभीर मानसिक धक्क्यात असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अनिता शिंदे आणि प्रतिभा राऊत यांनी रुग्णालयात भेट देऊन पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाची विचारपूस केली. डॉ. गोऱ्हे यांच्याकडून कुटुंबाला तत्काळ आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले आहे.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटे यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला . पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांबाबत पोलिस यंत्रणांनी अधिक संवेदनशीलता, सतर्कता आणि कठोर कायदेशीर भूमिका घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच पोलिस अधीक्षकांना निवेदन पाठवले आहे.

प्रमुख मुद्द्यांना प्राधान्य देण्याची केली मागणी

शेतमजूर व कामगारांच्या दूरस्थ वस्त्यांमध्ये रात्रगस्त वाढवून विशेष सुरक्षा पथक तैनात करणे

महिलां–मुलांसाठी हेल्पलाईन, प्रकाशयोजना आणि तातडीची मदत केंद्रे उपलब्ध करून देणे

आरोपीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदींची तपासणी करून आवश्यक असल्यास एमपीडीए अंतर्गत कारवाई करणे

पीडित मुलगी आणि तिच्या बहिणीच्या संबंधित प्रकरणातील पुरावे काटेकोरपणे संकलित करून फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी सुनिश्चित करणे

मनोधैर्य योजनेतील आर्थिक सहाय्य तत्काळ मंजूर करणे

कुटुंबाला वैद्यकीय, मानसशास्त्रीय आणि कायदेशीर मदत सातत्याने उपलब्ध करून देणे

“अल्पवयीन बालिकांवरील अत्याचार हा समाजाच्या सुरक्षिततेला थेट धोका आहे. अशा गुन्ह्यांविरुद्ध शून्य सहिष्णुतेची भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. पीडितेला न्याय मिळेपर्यंत आणि सुरक्षित वातावरण मिळेपर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहील,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×