Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

हडपसर भागात खासगी रुग्णालयात तोडफोड

चुकीच्या उपचारामुळे रुग्ण दगवल्याचा केला आरोप

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना बुधवारी घडली. उपचारादरम्यान रुग्ण दगाविल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनावर आरोप करुन तोडफोड केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तोडफोड प्रकरणात काही जणांना ताब्यात घेतले.

पुणे विमानतळावर २ कोटी २९ लाख रूपयांचा हायड्रोपोनीक गांजा पकडला – सविस्तर बातमी

हडपसर भागातील एका खासगी रुग्णलयात उपचारासाठी रुग्ण दाखल झाला होता. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी रुग्णाचे नातेवाईक आवारात जमले. डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगाविल्याचा आरोप करुन नातेवाईकांनी दुपारी बाराच्या सुमारास तोडफोड करण्यास सुरुवात केली. रुग्णालायच्या काचेच्या दरवाज्यांवर दगडफेक करण्यात आली, तसेच खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय माेगले यांनी घटनास्थळी भेट दिली. तोडफोडीनंतर रुग्णलयाच्या परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त मागविला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुर असून, काही जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मोगले यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×