Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुणे पोलिस दलात २ नवीन परिमंडळांची निर्मिती

पुणे पोलिस दलात २ नवीन परिमंडळांची निर्मिती

सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या

marathinewsw24.com

पुणे – शहर पोलीस दलात २ नवीन परिमंडळ निर्माण करण्यात आले. जुन्या कार्यक्षेत्राचे विभाजन करुन नवीन परिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार नवीन पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने नुकतीच शहर पोलिस दलासाठी नवीन पाच पोलिस ठाण्यासह दोन परिमंडळास मान्यता दिली आहे. त्यानुसार नवीन परिमंडळावर पोलिस उपायुक्तांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

एकात्मता भारतीय ज्ञान परंपरेचा मुख्य बिंदू – सविस्तर बातमी 

परिमंडळांच्या उपायुक्तांच्याही काही प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य राखीव पोलिस दल, गट ७ दौंडचे समादेशक चिलुमुला रजनीकांत यांची परिमंडळ ४ च्या पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजलक्ष्मी शिवणकर यांची पोलिस मुख्यालयातून परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांची परिमंडळ सहा च्या पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर परिमंडळ ४ चे सोमय मुंडे यांची परिमंडळ सातच्या पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे. पुण्यात नव्याने आलेले सागर कवडे यांची पोलिस उपायुक्त मुख्यालय येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
तसेच परिमंडळ ६ व ७ साठी प्रत्येकी २ सहायक पोलिस आयुक्तपद निर्माण करण्यात आल्याने शहरातील सहायक पोलिस आयुक्तांच्याही अंतर्गत बदल्या केल्या आहेत.

सहायक पोलीस आयुक्त बदल्या

अतुलकुमार नवगिरे (विशेष शाखा ते हडपसर विभाग नुतन पवार (विशेष शाखा ते लोणीकंद विभाग, प्रांजली सोनावणे (येरवडा विभाग) ते खराडी विभाग, राहुल आवारे (स्वारगेट विभाग) ते भारती विद्यापीठ विभाग, सुनिल जैतापूरकर (अभियान) ते येरवडा विभाग, धन्यकुमार गोडसे (आस्थापना) ते स्वारगेट विभाग, अनुराधा उदमले (हडपसर विभाग) ते लोणी काळभोर विभाग, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे (पदोन्नती) गुन्हे शाखा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×