घरकाम करणाऱ्या महिलेचा डॉक्‍टरने केला विनयभंग

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरी काम करत असताना महिलेला कोणत्‍या न कोणत्‍या कारणावरून स्पर्श करून डॉक्‍टरने विनयभंग केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. साजीद शेख (रा. ग्रिन एकर्स सोसायटी, कोंढवा, खुर्द) असे गुन्‍हा दाखल करण्यात आलेल्‍याचे नाव आहे. याबाबत ३० वर्षीय महिलेनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार दि. 7 नोव्‍हेंबर 2025 ते 12 डिसेंबर दरम्‍यान घडला. दाखल गुन्‍ह्यानुसार महिला डॉक्‍टरच्‍या घरी काम करत असताना त्‍यांने तिला स्पर्श केला. तिने या प्रकाराला विरोध केल्‍यानंतर त्‍याने तिला कामावरून काढण्याची धमकी दिली. एके दिवशी महिला आरोपींच्‍या घरी पाणी अणि दुध घेऊन आल्या असताना आरोपीने तिचा हात पकडून नंतर तिच्‍यासोबत अश्लिल चाळे केले. यानंतर महिलेनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गॅसजोडणी तोडण्याची घातली भीती, जेष्ठाला २३ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

अल्‍पवयीन मुलीची केली प्रसुती

पुणे – अल्‍पवयीन मुलीवर लैंगिक अत्‍याचार करून ती गर्भवती राहिल्‍यानंतर नागपूर येथून बनावट जन्माचा दाखला आणला. त्‍यानंतर ससून रूग्णालयात मुलीची प्रसुती घडवून आणल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांची आणि डॉक्‍टरांची दिशाभूल केल्‍याप्रकरणी, बलात्‍कार, बाल लैंगिक अत्‍याचाराच्‍या विविध कलमान्वये गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. चेतन सुर्यकांत आरणे (25, रा. प्रगतीनगर, हडपसर) व पिंकी नितीन डागोरे उर्फ जेंसीटा सेबीस्‍टीयन (रा. हडपसर) अशा दोघांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी पिडीत मुलगी ही अल्‍पवयीन नसल्‍याबाबत नागपूर महानगर पालिकेचा पिडीत मुलीचा बनावट जन्माचा दाखला ससून हॉस्पीटल येथील वैद्यकीय अधिकारी यांना दाखवून अपत्‍य जन्मास घातले. त्‍यांनी पोलिस व डॉक्‍टरांची दिशाभूल केल्‍यानंतर हा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2023 ते 2024 दरम्यान घडला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×