गॅसजोडणी तोडण्याची घातली भीती, जेष्ठाला २३ लाखांचा गंडा

कंपनीत गुंतवणूकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र गॅस निगम लिमीटेडची गॅस जोडणी तोडण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी जेष्ठाला तब्बल २३ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ६ ते ८ डिसेंबर २०२५ कालावधीत औंध परिसरात घडली आहे. याप्रकरणी ८७ वर्षीय जेष्ठाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पोची दुचाकीस्वाराला धडक, तरूण ठार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक औंधमध्ये राहायला असून, ६ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना मोबाइलद्वारे संपर्क साधला. महाराष्ट्र गॅस निगम लिमीटेडची गॅस जोडणी तोडण्याची भीती दाखवली. त्यानंतर पैसे भरण्याच्या बहाण्याने तक्रारदार यांच्याकडून ऑनलाईनरित्या २३ लाख रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अश्विनी ननवरे तपास करीत आहेत.

गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक

शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल ८ लाख १५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना २२ ऑक्टोबर ते ६ डिसेंबर २०२५ कालावधीत सिंहगड रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×