भाडेतत्वावर लॅपटॉप घेण्याचे आमिष, २ कोटींची फसवणूक

भाडेतत्वावर लॅपटॉप घेण्याचे आमिष, २ कोटींची फसवणूक

दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – खासगी कंपनीसाठी भाडेतत्वावर लॅपटॉप घेण्याचे आमिष दाखवून दाम्पत्याने एकाची २ कोटी २४ लाख रुपयांची फसवणूक केली. दाम्पत्याने भाडेतत्त्वावर घेतलेले लॅपटॉप परत न करता अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर शिवाजी पाटेकर, नूतन ज्ञानेश्वर पाटेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्यावसायिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अल्पवयीनाकडून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावासायिकाची गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आरोपी दाम्पत्याशी ओळख झाली होती. आरोपींनी व्यावसायिकाला खासगी कंपनीला लॅपटॉप भाडेतत्त्वावर हवे असल्याचे सांगितले. एका लॅपटॉपसाठी दरमहा १५ ते २५ हजार रुपये भाडे मिळेल, असे आमिष दाखविले. व्यावसायिकाने त्यांना ५३४ लॅपटॉप भाडेतत्त्वावर घेउन दिले. गेले वर्षभरात आरोपी दाम्पत्याने त्यांना लॅपटॉपचे भाडे दिले नाही. लॅपटॉप परत करण्याची मागणी केल्यानंतर लॅपटॉप परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×