Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विश्रांतवाडी, हडपसर भागात घरफोडी

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला

चोरट्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील विश्रांतवाडी, हडपसरमधील सय्यदनगर भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांविरुद्ध काळेपडळ आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सराइतांकडून पोलीस हवालदाराला मारहाण – सविस्तर बातमी

विश्रांतवाडीतील विद्यानगर भागातील नवआकांक्षा सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एख लाख २० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि कुटुंबीय २८ डिसेंबर रोजी बाहेरगावी गेले होते. चाेरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून रोकड, तसेच दागिने लांबविल्याचा प्रकार मंगळवारी (३० डिसेंबर) उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत.

हडपसरमधील सय्यदनगर परिसरात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे गंठण आणि कपाटातील साडेपाच हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार तरुण सय्यदनगरमधील गल्ली क्रमांक १२ परिसरात राहायला आहेत. चोरट्यांनी २९ डिसेंबर रोजी घराचे कुलूप तोडून कपाटातील गंठण, रोकड असा ६५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×