Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

आरोग्य सेवकाने ३ लाखांची लाच स्वीकारली

पुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले

बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – आरोग्य सेवकाने बदलीसाठी ३ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रामकिसन गंगाधर घ्यार (४३) याला अटक करण्यात आले आहे. तो पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत आहे.

सासरच्या छळामुळे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या – सविस्तर बातमी 

तक्रारदार हे आरोग्य सेवक असून, त्यांची जून २०२५ मध्ये उपसंचालक आरोग्य कार्यालय, कोल्हापूर मंडळ येथून पुणे मंडळात बदली झाली होती. मात्र पुणे मंडळात नियुक्ती न देता त्यांना आरोग्य सेवक पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव, ता. इंदापूर येथे रिक्त पदावर नियुक्ती मिळावी यासाठी बदलीचा अर्ज केला होता. या प्रकरणात उपसंचालक आरोग्य, पुणे मंडळ कार्यालयातील अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या संपर्कात आरोपी रामकिशन घ्यार हा मध्यस्थ म्हणून कार्यरत होता. बदलीचे काम करून देण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे ३ लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने २ डिसेंबर २०२५ रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या अनुषंगाने ४ व ५ डिसेंबर रोजी पडताळणी करण्यात आली असता, लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. अखेर २ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद, पुणे कार्यालयासमोर सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचण्यात आला. आरोपी रामकिशन घ्यारने तक्रारदाराकडून ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×