Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची १७ लाखांची फसवणूक

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांकडून बँक खात्याचा वापर झाला असून, याप्रकरणात कारवाई करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची १७ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भवानी पेठेत घरफोडी, २७ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी जुलै महिन्यात संपर्क साधला होता. पहलगामधील दहशतवादी हल्ला प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली होती. दहशतवाद्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बंँक खात्याचा वापर केला आहे. याप्रकरणात जम्मू-काश्मिर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. कारवाईची भीती चोरट्यांनी दाखविली. अटक टाळण्यासाठी पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांची आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×