Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

बजाज कंपनीकडून ‘डोमिनार ४००’ मोटार सायकलीचे पोलीस दलास हस्तांतरण

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

marathinews24.com

पुणे – ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ करिता बजाज कंपनीकडून पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस शहर आयुक्तालय आणि पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकरिता शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे ‘डोमिनार ४००’ या अत्याधुनिक सुविधांनीयुक्त १०० मोटार सायकलीचे हस्तांतरण करण्यात आले.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी – सविस्तर बातमी

यावेळी पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे शहरचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पिंपरी-चिंचवडचे शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजाजन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बजाजचे मार्केटिंग विभागाचे अध्यक्ष सुमित नारंग, नवउत्पादन विकास विभागाचे उपाध्यक्ष उदयन शाह आदी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात १९ ते २३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’करिता ४३७ कि.मी. अंतराच्या सायकल स्पर्धेच्या मार्गावर ‘डोमिनार ४००’ ही मोटरसायकल प्रथम अधिकृतपणे ताफ्याचा भाग होणार आहेत. त्यानंतर दैनंदिन कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या कर्तव्यांसाठी तीन पोलिस दलाला उपयुक्त ठरणार आहे. बजाज पुणे ग्रॅण्ड टूरच्या ४३७ कि.मी.च्या मार्गावरील रस्ते पायाभूत सुविधांसह तयार करण्यात आले असून हा मार्ग ९ तालुके आणि १५० गावाच्या शहरी आणि ग्रामीण भागातून जातो. अशा वेळी नवीनतम दळणवळण तंत्रज्ञान आणि आपत्कालिन यंत्रणेने सुसज्ज अशा या डोमिनार ४००’ पोलिस विशिष्ट मोटरसायकल पोलिस दलांना कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. ‘डोमिनार ४००’ मोटरसायकली पोलिस कर्मचाऱ्यांना प्रभावीपणे गस्त घालण्यासाठी आणि शहरी व ग्रामीण भागांमध्ये जलद आपत्कालीन प्रतिसादासाठी खास करुन तयार करण्यात आल्या आहेत.

डोमिनार ४०० : आधुनिक मोटरसायकल पोलिसांना आव्हानात्मक कामे करतांना लागणाऱ्या गरजांचा विचार करून त्यांच्या मूळ आवृत्त्यांपेक्षा मोठ्या प्रमाणात सुधारित करण्यात आल्या आहेत. सुधारित दृश्यमानता आणि दळणवळण: वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी आणि घटनांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी ‘डोमिनार ४००’ मध्ये शक्तिशाली एलईडी आपत्कालीन दिवे, सायरन आणि पुश-टू-टॉक रेडिओ ट्रान्समिशनसह सार्वजनिक घोषणा प्रणाली बसविण्यात आली आहे. यामध्ये जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम आणि मोबाईल फोन व वॉकी-टॉकीसारख्या आवश्यक उपकरणांसाठी चार्जिंग पॉइंट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

प्रत्येक ‘डोमिनार ४००’ मध्ये आपत्कालीन प्रथमोपचार किट बसविण्यात आले आहे. या बाइक्समध्ये एकात्मिक आणि कुलूप लावता येण्याजोग्या साइड पॅनियर्ससह टॉप बॉक्स येतो, जो प्रथमोपचार किट, फॉरेन्सिक साधने आणि कागदपत्रे यांसारखी आवश्यक उपकरणे वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सुधारित कार्यक्षमता, हाताळणी आणि सुरक्षा: शक्तिशाली ३७३.३ सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन आणि विश्वसनीय कार्यक्षमतेसह सुसज्ज असलेल्या ‘डोमिनार ४००’ मध्ये हाय-स्पीड पाठलाग किंवा आव्हानात्मक परिस्थितीत उत्तम हाताळणी, कुशलता आणि सुरक्षिततेसाठी अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम , ट्रॅक्शन कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन ॲडजस्टमेंट यासारखी प्रगत रायडर सहाय्यक वैशिष्ट्ये आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×