पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ निमित्त स्पर्धा

पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ निमित्त स्पर्धा

शाळा-महाविद्यालयांना सोमवारी सुटी

marathinews24.com

पुणे – ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रोलॉग सायकल स्पर्धेच्या निमित्ताने साेमवारी (१९ जानेवारी) स्पर्धा मार्गावरील शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. नामदार गोपाळ कृष्ण गाेखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), जंगली महाराज रस्ता, शहरातील मध्यभाग, तसेच स्पर्धा मार्गावरील शाळा-महाविद्यालायांना सुटी जाहीर केली आहे.

भाजपवाले मोठे कलाकार, शिंदें आणि अजितदादांचा काटा काढला – मनोज जरांगे पाटील – सविस्तर बातमी 

साेमवारी (दि.१९) सकाळी नऊ ते सायंकाळी सहा दरम्यान स्पर्धा मार्ग, तसेच जोडणारे उपरस्ते वाहतुकीस बंद राहणार असल्याने या भागातील शाळा, महाविद्यालयांना सु्टी जाहीर आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिले आहेत, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त मनोज पाटील, तसेच सहायक आयुक्त नंदिनी वाग्यानी-पराजे उपस्थित होते.

‘रस्ते बंद असल्याने स्पर्धा मार्गावरील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सु्टी जाहीर करण्यात आली. स्पर्धा मार्गावरील खासगी कार्यालयातील कर्मचारी, व्यावसायिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शक्यतो मेट्रो सेवेचा वापर करावा,’असे आवाहन सहपोलीस आयुक्त शर्मा यांनी केले आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर-घोले रस्ता, विश्रामबाग वाडा-कसबा, ढोले पाटील रस्ता, भवानी पेठ, औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, सिंहगड रस्ता आणि वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था सोमवारी पूर्ण वेळ बंद ठेवणे अत्यावश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

खासगी कार्यालयांनी शक्य असल्यास सुटी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सुटी देणे शक्य नसल्यास मेट्रो सेवा किंवा अन्य पर्यायी वाहतूक मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×