Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: ल्यूक मडग्वेचे वर्चस्व कायम; ‘मराठा हेरिटेज सर्किट’मध्ये सलग दुसरा विजय

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: ल्यूक मडग्वेचे वर्चस्व कायम; ‘मराठा हेरिटेज सर्किट’मध्ये सलग दुसरा विजय

आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

marathinews24.com

पुणे – पुण्यात आयोजित ऐतिहासिक ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेने दुसऱ्या दिवशी अधिकच थरारक वळण घेतले. ‘मराठा हेरिटेज सर्किट’ या दुसऱ्या टप्प्यात चीनच्या ‘ली निंग स्टार’ संघाचा सायकलपटू ल्यूक मडग्वे याने सलग दुसरा विजय मिळवत ‘यलो जर्सी’वरील आपले वर्चस्व कायम राखले. या वेळी आमदार भीमराव तापकीर आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम आदी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी सायकलपटूंचा गौरव करण्यात आला.

‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेचे उत्कृष्ट व्यवस्थापन; आंतरराष्ट्रीय सायकलपटूंकडून कौतुक – सविस्तर बातमी 

आजचा दुसरा टप्पा ‘मराठा हेरिटेज सर्किट’ अंतर्गत १०५.३ किलोमीटरचा होता. पुण्याच्या कॅम्प परिसरातील लेडीज क्लब येथून दुपारी १२.३० वाजता शर्यतीला प्रारंभ झाला, तर सिंहगड रोडवरील नांदेड सिटी येथे समारोप झाला. डोंगराळ भूभाग, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाचे रस्ते यामुळे हा टप्पा सायकलपटूंच्या ताकद, तंत्र आणि सहनशक्तीची कसोटी पाहणारा ठरला.

ल्यूक मडग्वे याने ०२:३१:४९ या वेळेत शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. थायलंडच्या ‘रुजाई इन्शुरन्स’ संघाचा अ‍ॅलन कार्टर बेटल्स दुसऱ्या, तर बेल्जियमचा यॉर्बन लॉरिसेन तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

दुसऱ्या टप्प्यानंतर विविध श्रेणींतील जर्सी विजेते पुढीलप्रमाणे ठरले आहेत: यलो जर्सी (एकूण आघाडी) : ल्यूक मडग्वे (चीन), पोल्का डॉट जर्सी (किंग ऑफ द माउंटेन्स) : स्टीफन बेनेटन (गुआम), ऑरेंज जर्सी (सर्वोत्कृष्ट आशियाई सायकलपटू) : जंबालजाम्ट्स सेनबायर (मंगोलिया/स्पेन), व्हाईट जर्सी (सर्वोत्कृष्ट युवा सायकलपटू) : तिजसेन विगो (नेदरलँड्स), तर ब्ल्यू जर्सी (भारताचा सर्वोत्तम सायकलपटू) : मनव सरदा (इंडियन डेव्हलपमेंट टीम).

ही स्पर्धा भारतातील सायकलिंग क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरत असून UCI 2.2 श्रेणीतील ही देशातील पहिली पाच दिवसांची मल्टि-स्टेज ‘कॉन्टिनेंटल सायकल रेस’ आहे. पाच खंडांतील ३५ देशांचे १७१ आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. एकूण ४३७ किलोमीटरचा मार्ग पुणे जिल्ह्यातील ९ तालुके आणि १५० गावांतून जात असून, अवघ्या ७५ दिवसांत जागतिक दर्जाच्या या स्पर्धेसाठी रस्ते व पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यात आल्या आहेत.

विजयानंतर बोलताना ल्यूक मडग्वे म्हणाला, “आजचा दिवस अत्यंत उष्ण होता आणि चढाव खूप आव्हानात्मक होते; मात्र संघातील सहकाऱ्यांच्या उत्तम साथीतून हा विजय मिळवता आला.”

स्पर्धेचा तिसरा टप्पा उद्या, २२ जानेवारी २०२६ रोजी ‘वेस्टर्न घाट गेटवे’ अंतर्गत पुरंदर ते बारामती (१३४ किमी) दरम्यान पार पडणार असून, या टप्प्यात पुणेकरांना जागतिक दर्जाच्या सायकलपटूंच्या वेगवान आणि थरारक कामगिरीचा अनुभव घेता येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×