Breking News
महिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआडसोशल मीडियावर कृषी विभागात नोकरीची जाहिरातवानवडीत अतिक्रमणांवर बुलडोझर; अनधिकृत टपऱ्या हटवल्याट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या तरुणाने सोडला श्वासबीडच्या धर्मापुरीत गांज्याचा साठ्यावर धाडआषाढी पालखी सोहळा-२०२६ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यातबाणेर रोडवरील पावसाळी पूर्वतयारीचा आढावा; अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची संयुक्त पाहणीपीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंप प्रलंबित आस्थापना व तक्रार निवारण कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसादआत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत संपवले आयुष्यमुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

marathinews24.com

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

जेष्ठाला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकीचे आमिष महागात – सविस्तर बातमी 

अजित दादांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. दादांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत.

अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य आपण जपू या असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशी विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×