Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय परिसरात वाहतूक बदल

चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर वाहतूक वळविण्याचे आदेश जारी

पोलीस भरतीनिमित्त वाहतूक बदल

marathinews24.com

पुणे – पोलीस भरती प्रक्रियेनिमित्त पाषाण रस्त्यावरील पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील अंतर्गत रस्ते दररोज पहाटे चार ते सायंकाळी सहा यावेळेत वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण मुख्यालयाच्या परिसरातील वाहतूक बदल १७ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहेत.पोलीस भरती प्रकियेसाठी उमेदवारांची ग्रामीण मुख्यालायाच्या आवारात उमेदवारांची होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून (११ फेब्रुवारी) वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

पासपोर्ट कार्यालयाकडून पोलीस पडताळणीबाबत मार्गदर्शन – सविस्तर बातमी 

पुणे ग्रामीण मुख्यालयातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक बदल १७ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहेत. या भागातील वाहतूक दररोज पहाटे चार ते सायंकाळी सहापर्यंत बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. पाषााण रस्त्यावरील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ते बाणेर रस्त्यावरील पुरंदर हाॅल दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पाषाण रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळील प्रवेशद्वार ते बाणेर ररस्त्यावरील प्रवेशद्वार हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×