Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

विनयभंग प्रकरणी आरोपीला १० वर्षांनंतर कारावासाची शिक्षा

बीडमधील गायकवाड हत्या प्रकरणात २ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

आरोपीला तब्बल १० वर्षांनंतर सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

marathinews24.com

पुणे – महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तब्बल १० वर्षांनंतर सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या योग्य तपासामुळे शक्य झाली. रमेश सदोरमल केसवानी ( वय ७३, रा. पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे.

भारतीय सैन्याला ‘संरक्षण’ सेना नव्हे तर ‘सशस्त्र’ सेना म्हणा-एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) – सविस्तर बातमी

फिर्यादी तरुणी २०१६ मध्ये शिक्षणासाठी लोकलने तळेगाव ते कासारवाडी दरम्यान प्रवास करत होती. त्यावेळी आरोपी रमेश केसवानी याने तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला होता. या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने साक्षीपुरावे व दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेत आरोपीला सहा महिन्यांच्या सश्रम कारावासासह एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

सरकारी पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद करण्यात आला. तपास अधिकाऱ्यांनीही पुरावे व्यवस्थितरित्या सादर केले. या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलिस अधीक्षक रोहीदास पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस प्रमोद खोपीकर यांच्यासह पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×