Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

उकळी पेन येथे माता भीमाई जयंती उत्साहात साजरी

उकळी पेन येथे माता भीमाई जयंती उत्साहात साजरी

समता फाउंडेशनच्या वतीने उकळीपेन येथे माता भीमाई जयंतीचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा

marathinews24.com

वाशीम –  डॉ. बाबासाहेब आंबेडकरासारख्या महामानवाला ज्या माऊलीने जन्म दिला त्या वंदनीय मातृत्वाला कोटी कोटी वंदन करून, जिच्या त्यागामधून एक राष्ट्रपुरुष घडला, त्या राष्ट्रपुरुषाने अखंड भारत एकसंघ राहावा म्हणून सुंदर असं संविधान दिल आणि त्यामुळे आपल्याला हक्क अधिकार मिळाले यामुळेच माता भीमाई चे उपकार अनंत आहेत. याचं उपकाराची जाणीव म्हणून समता फाउंडेशन च्या वतीने जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

आयुष्याच्या वाटचालीतील प्रेमाची रूपे कवितांमध्ये मांडली- संदीप खरे – सविस्तर बातमी 

या प्रसंगी जेष्ठ उपासक संभाजी इंगोले, मनोहर उचित, साहेबराव कांबळे, आकाश इंगोले, शाहीर जनार्धन इंगोले, कबीर वाघमारे, कचरू भगत, किरण भगत, प्रवीण इंगोले, किसन भगत, मुक्ताबाई इंगोले, अनिल भगत, रवी भगत, सुबोध उचित, बुद्धभूषण कांबळे, कैलास भगत सचिन भगत,उपासिका लक्ष्मी बाई उचित, पुजाबाई वाघमारे, मंगलाबाई कांबळे, यशोदाबाई लबडे, निर्मलाबाई इंगोले, बुगनाबाई हनुवते, जाणकाबाई इंगोले, सुशीलाबाई इंगोले, कांताबाई भगत, कांताबाई वाघमारे, शोभाबाई इंगोले उज्ज्वलाबाई इंगोले, रेणुकाबाई कांबळे, सरस्वती भगत, कमलाबाई भगत, दारकाबाई भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी पूजाताई वाघमारे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा बौद्ध विहाराला भेट स्वरूप दिली. त्यांच्या या कार्याबद्दल समता फाउंडेशन ने त्यांचे आभार व्यक्त केले, कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन समता फाउंडेशन अध्यक्ष दिपक लबडे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×