Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

उद्योगांशी निगडित समस्यांचे वेळेत निराकरण करा

उद्योगांशी निगडित समस्यांचे वेळेत निराकरण करा

निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – उद्योगांशी निगडित समस्यांचे संबंधित विभागांनी विहीत वेळेत निराकरण करावे. फलॅटेड गाळे भाडे अनुदान योजनेची सविस्तर माहिती अधिकाधिक सूक्ष्म व लघू उद्योजकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्व औद्योगिक संघटना व सभासदांनी जनजागृती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले.

गृह निर्माण प्रकल्पात पुढील दोन वर्षात पक्की घरे- सीईओ सतीशकुमार खडके – सविस्तर बातमी 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा सल्लागार समिती, जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनर्वसन समिती, स्थानिक लोकांना रोजगार समिती व जिल्हा निर्यात प्रचलन समिती यांच्या संयुक्त बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी, विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कदम यांनी सांगितले की, जिल्हा निर्यात प्रचलन समितीच्या माध्यमातून नवीन महाराष्ट्र राज्य निर्यात धोरण २०२३ याची व्यापक प्रसिद्धी करून जिल्ह्यातील निर्यात वाढीस चालना द्यावी. संबंधित धोरणातील विविध प्रोत्साहनांचा जास्तीत जास्त उद्योग घटकांनी लाभ घ्यावा, यासाठी औद्योगिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी पीएमपीएमएलमार्फत बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच औद्योगिक घटकांना अखंडित व पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा उपलब्ध करून देणे, औद्योगिक क्षेत्रात स्थानिक नागरिकांना रोजगार देण्याबाबतच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेवटी महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×