मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले; गैरसमजातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले; गैरसमजातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

पोलिसांनी 5 जणांना केली अटक

marathinews24.com

पुणे – मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याच्या गैरसमजातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात घडली. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

चेन स्नॅचिंग करणारे चोरटे २४ तासांत जेरबंद – सविस्तर बातमी 

प्रिन्स शैलेंद्र सिंग (वय २६, रा. भैरवनाथनगर, कोंढवे धावडे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी करण गणपत वाशिलकर (वय ३४), राेहित उर्फ ओजी गणेश मैार्य (वय २४), गणेश सिद्धराम कालदीप (वय २०), आदित्य गणेश पवार, बबलू शिवाजी कांबळे (वय २२, रा. सर्व रा. उत्तमनगर) यांना अटक करण्यात आली. याबाबत सिंग याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर भागातील कोंढवा गेट परिसरात प्रिन्स सिंग हा ५ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास थांबला होता. सिंग याने मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले, असा गैरसमज आरोपी वाशिलकर याचा झाला. वाशिलकर आणि साथीदार मौर्य, कालदीप, पवार, कांबळे यांनी सिंग याला शिवीगाळ केली. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक कुरेवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×