Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

हडपसरमधील कृष्णानगर भागात गोदामात आग

हडपसरमधील कृष्णानगर भागात गोदामात आग

कोणतीही जीवितहानी नाही

marathinews24.com

पुणे – हडपसरमधील कृष्णानगर भागात शनिवारी पहाटे एका गोदामात आग लागली. गोदामाच्या परिसरात असलेल्या चार झोपड्या जळाल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या परिसरात लावलेल्या चार दुचाकी जळाल्या.

वैमनस्यातून मार्केटयार्ड परिसरात एकावर पिस्तुलातून गोळीबार – सविस्तर बातमी 

हडपसरमधील कृष्णानगर भागात गोदाम आहे. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास गोदामाला आग लागली. गोदामाच्या शेजारी असलेल्या झोपड्यांना झळ पोहोचली. आगीत चार झोपड्या जळाल्या. गोदामाच्या परिसरात लावलेल्या चार दुचाकींनी पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या हडपसर केंद्रातील बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन अर्ध्या ते पाऊण तासात आग आटाेक्यात आणली. गोदामात आग लागल्याचे समजताच शेजारी असलेल्या झोपड्यांमधील रहिवासी बाहेर पडल्याने बचावले. झोपड्यांमधील गृहोपयोगी साहित्य, शेजारी लावलेल्या चार दुचाकी जळाल्या. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×