Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुण्यात सराफाकाडून ११ कोटींची फसवणूक

पर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूक

३ व्यावसायिकांवर गुन्हा

marathinews24.com

पुणे – किरकोळ सोन्याची विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाची भवानी पेठेतील दुसऱ्या सराफी व्यावसायिकाने तब्बल ११ कोटी ५७ लाख ५२ हजार ५५७ रुपयांना फसवणूक केली. पैसे घेऊन खरेदी केलेले सोने-चांदी न देता ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी पंकज गौतमचंद कोरीमुथा, नेमीचंद कोरीमुथा व आशिष नेमीचंद कोरीमुथा (रा. सर्व. शांतीनगर सोसायटी, भवानी पेठ) यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण जाधव (वय ४१) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार १ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत घडला आहे.

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार मुळचे चिंचवडमधील आहेत. त्यांचे मध्यभागात सराफी दुकान आहे. ते किरकोळ सोने विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान, आरोपींचे सोने-चांदीचे ठोक स्वरूपात विक्रीचा व्यावसाय आहे. ते छोट्या सराफ दुकानांना सोने देतात. त्यांची श्री नवकार प्लस ज्वेलर्स व नवकार ज्वेलर्स नावाने फर्म आहे. दरम्यान, तक्रारदारांनी या आरोपींना सोने-चांदी खरेदीच्या व्यवहरातून आरटीजीएसद्वारे ११ कोटी ४२ लाख ८४ हजार ६०० रुपये रक्कम त्यांच्या पत्यावर पाठवली होती. तर, मागच्या व्यवहारातील १४ लाख ६७ हजार ९५७ रुपये शिल्लक रक्कम होती. ठरल्याप्रमाणे मात्र, आरोपींनी त्यांना सोने-चांदी न देता तक्रारदार यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक सपकाळे या करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×