Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय ‘टुरिस्ट गाईड ट्रेनिंग’

पर्यटन संचालनालयामार्फत ‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत पुणे प्रादेशिक विभागातील इच्छुक युवक-युवतींसाठी टुरिस्ट गाईड ट्रेनिंग

‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत पुणे प्रादेशिक विभागातील इच्छुक युवक-युवतींसाठी ‘टुरिस्ट गाईड ट्रेनिंग’

marathinews24.com

पुणे – पर्यटन संचालनालयामार्फत ‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत पुणे प्रादेशिक विभागातील इच्छुक युवक-युवतींसाठी टुरिस्ट गाईड ट्रेनिंग हे सात दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पर्यटन स्थळांवर मार्गदर्शन, आदरातिथ्य सेवा तसेच पर्यटनाशी संबंधित विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार ; ९६ तासांत होणार घरपोच – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि १८ ते ४५ वयोगटातील सुमारे २०० युवक-युवतींना या प्रशिक्षणाची संधी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये ग्वाल्हेर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच सिंहस्थ कालावधीत टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.

इच्छुकांनी दि. २० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत गुगल फॉर्मद्वारे अर्ज करावा. निवड प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक :
https://docs.google.com/forms/d/e/RFAIpQLScbn°rmXID८०R@hfCD_ZdxPyHbLDcUeAynPwPWHs4RgVKG४Q/viewform⁠�
अधिक माहितीसाठी प्रादेशिक पर्यटन कार्यालय, पुणे (दूरध्वनी : ८०८००३५१३४) येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपसंचालक भरत लांघी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×