Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुणे एसटी प्रवासात जेष्ठे महिलेकडील 21 हजारांची रोकड चोरीला 

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एसटी प्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या पिशवीतून २१ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून ६ लाख २६ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २८ मार्चला सव्वासात ते रात्री साडेनउच्या वेळेत बारामती ते हडपसर एसटी प्रवासात घडली आहे. याप्रकरणी बारामतीत राहणार्‍या ६३ वर्षीय जेष्ठेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खराडीत वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बारामतीत राहायला असून, २८ मार्चला रात्री सव्वा सातच्या सुमारास एसटीतून हडपसरच्या दिशेने प्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून २१ हजारांची रोकड आणि ६ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. एसटीतून खाली उतरताना महिलेला पिशवीतून ऐवजाची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×