Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

कोथरूडमध्ये घरफोडी- साडेपाच लाखांचा ऐवज चोरी

कोथरूडमध्ये घरफोडी- साडेपाच लाखांचा ऐवज चोरी

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा पाच लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पौड रस्ता भागातील धनश्री सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार आणि कुटुंबीय सदनिका बंद करुन १ मार्च रोजी बाहेर गेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री सदनिकेच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा पाच लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी उजवी भुसारी काॅलनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार दगडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×