Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

डाॅक्टरांची ‘ऑनलाइन अपाॅईंटमेट’ घेणाऱ्या महिलेची ५ लाखांची फसवणूक

पुण्यात मद्यधुंद तरुणांची ‘गाडीत' हुल्लडबाजी

सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सायनसचा त्रास होत असल्याने प्रसिद्ध डाॅक्टरांची ऑनलाइन अपाॅईंटमेंट घेणाऱ्या ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी ५ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणाची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांना सायनसचा त्रास होत आहे. त्यांनी मोबाइलवर या विकारावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांची माहिती घेतली. डाॅक्टरांची माहिती घेतल्यानंतर त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला. डाॅक्टरांची अपाॅईंटमेंट घेण्यासाठी त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा डाॅक्टरांऐवजी तेथे सायबर चोरट्यांनी त्यांचा मोबाइल क्रमांक टाकला होता. सायबर चोरट्यांनी अपाॅईंटमेंट मिळवण्यासाठी सुरुवातीला पाच रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यास सांगितले. महिलेने ऑनलाइन पद्धतीने पाच रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले.

महिलेचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला आहे. चोरट्यांनी महिलेचा मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून ५ लाख ५४ हजार रुपये स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. त्या वेळी कुटुंबियांना संशय आला. चोरट्याने मोबाइल क्रमांक बंद केल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×