Breking News
ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीकडून गोळीबार; दोघे जखमीकेंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते लिंगभाव समावेशनावरील आशियातील पहिल्या युनेस्को अध्यासनाचे उद्घाटनमराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण

चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी

चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी

पुणे स्टेशन परिसरातील घटना; ८१ हजारांसह ऐवज लंपास

marathinews24.com

पुणे – रेल्वे स्थानकाच्या परिसरात चाकूचा धाक दाखवत दोन तरुणांकडून रोख रक्कम, मोबाइल आणि सोन्याची अंगठी लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धीरजसिंग नारायणसिंग राजपूत (वय २९, रा. अथर्व अपार्टमेंट, विद्युत कॉलनी, जळगाव) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना ५ एप्रिलला सकाळी पावणेबाराच्या सुमारास पुणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या मागील मोकळ्या जागेत घडली.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर नोकरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांचा मित्र हे स्टेशन परिसरात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. आरोपींनी चाकूचा धाक दाखवत धमकावण्यास सुरुवात केली. ‘पैसे आणि मौल्यवान वस्तू द्या, अन्यथा जीवे ठार मारू’ अशी धमकी देत त्यांनी जबरदस्तीने दोघांकडील मोबाइल, ८१ हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी हिसकावून घेतली. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×