Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

टोळक्याकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्की

टोळक्याकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्की

अरण्येश्वर भागातील घटना

marathinews24.com

पुणे – रस्त्यावर फटाके फोडण्यास मज्जाव करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला टोळक्याने धक्काबु्क्की केल्याची घटना अरण्येश्वर परिसरात घडली. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला. याप्रकरणी शरद क्षीरसागर, ओंकार सूर्यवंशी, नयन कांबळे, सागर लोंढे, कुणाल लोंढे (रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर, सहकारनगर) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई राहुल उन्हाळे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ओैषध विक्री दुकानातील कर्मचाऱ्याकडून १० लाखांचा अपहार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आरोपींनी अरण्येश्वर परिसरात फटाके फोडले. रात्रपाळीत गस्त घालणारे पोलीस शिपाई उन्हाळे यांनी त्यांना हटकले. रस्त्यात फटाके फोडू नका, तसेच मधोमध लावलेली दुचाकी बाजूला काढा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोपींनी उन्हाळे यांना धक्काबुक्की केली. झटापटीत उन्हाळे यांचा गणवेश फाटला. शासकीय कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कोपनर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×