Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात भव्य संयुक्त अभिवादन सोहळा

लोकप्रतिनिधींनी वाहिली आदरांजली

marathinews24.com

पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती समिती’च्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी १० वाजता भव्य ‘संयुक्त अभिवादन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत महामानवाला अभिवादन केले.

मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन – सविस्तर बातमी

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार चेतन तुपे आणि माजी आमदार मोहन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, गणेश बिडकर, नगरसेवक निलेश आल्हाट, ज्येष्ठ नेते बाळासाहेब जानराव, रिपाई शहराध्यक्ष संजय सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, महिपाल वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रशासकीय व सामाजिक सहभाग

यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत कुंडलवार आणि समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासह विविध शासकीय अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात बँड पथकाच्या मानवंदनेने झाली. त्यानंतर बौद्ध भिक्षूंच्या उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना व भीमस्तुती सादर करण्यात आली. शेवटी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आयोजन

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सोहळ्यासाठी राहुल नागटिळक, विठ्ठल गायकवाड आणि समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×