स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – खासगी मुद्रणालयाचे (प्रिटींग प्रेस) कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख २० हजार रुपयांची यंत्रसामुग्री चोरून नेल्याची घटना गुलटेकडीत घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत मुद्रण व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात स्कॉर्पिओतून विदेशी दारू तस्करीचा भांडाफोड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात असलेल्या एका इमारतीत तक्रारदार व्यावसायिकाचे मुद्रणालय आहे. चोरट्यांनी मुद्रणालयाचे कुलूप तोडले. मुद्रणालयातून ३ लाख २० हजार रुपयांची यंत्र सामुुग्री चोरट्यांनी चोरुन नेली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण जाधव तपास करत आहेत. दरम्यान, पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी ९७ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.























