Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याच्या बतावणीने महिलांची फसवणूक करणारा अटकेत

विवाहाच्या आमिषाने येरवड्यातील महिलेची २६ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – देशातील नामवंत अवकाश संशोधन संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करुन महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला येरवडा पोलिसांनी अटक केली. आरोपी विवाहविषयक संकेतस्थळावरुन महिलांशी ओळख करुन त्यांची फसवणूक करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपीच्या बँक खात्यातून २१ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. आदर्श प्रशांत म्हात्रे (वय ३४, रा. अलिबाग, जि. रायगड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी म्हात्रे स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, जयेश पाटील अशी नावे सांगून महिलांची फसवणूक करत होती. याबाबत महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काकाने केला पुतणीचा विनयभंग, आरोपीला सोलापूर परिसरातून अटक – सविस्तर बातमी

आरोपीची फिर्यादी महिलेशी विवाहविषयक संकेतस्थळावरुन ओळख झाली होती. म्हात्रेने अवकाश संशोधन संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर त्याने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले. महिलेच्या मुलीचा सांभाळ करतो, असे त्याने तिला सांगितले. त्यानंतर त्याने महिलेकडे पैशांची मागणी केली. महिलेने बँकेकडून २६ लाख ५० हजार रुपयाे कर्ज काढले. ही रक्कम त्याने आरोपीला दिली. त्यानंतर महिलेने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरु केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली होती.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात म्हात्रे हा वेगवेगळ्या नावाने महिलांची फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली. तो ठाणे जिल्ह्यातील रबाळे पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटकेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेऊन अटक केली. पोलीस निरीक्षक विजय ठाकर तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विवाहविषयक संकेतस्थळावरुन महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी करताना महिलांनी खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×