पोलिसांना आठ महिने गुंगारा
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर गेले आठ महिने पोलिसांना गुंगारा देणारा नीलेश घायवळ टोळीतील गुंडाला गुन्हे शाखेने अटक केली. गुरुदत्त गुणाजी साळवे (वय ४४, रा. संत ज्ञानेश्वर काॅलनी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोथरूड पोलिसांनी घायवळ याच्यासह साथीदारांविरुद्ध आठ महिन्यांपूर्वी मकोका कारवाई केली होती.
मुंढव्यातील ब्युटीपार्लर चालक तरुणीचा खून प्रकरणाचा छडा – सविस्तर बातमी
कारवाई केल्यानंतर साळवे पसार झाला होता. गेले आठ महिने तो गुंगारा देत होता. गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक त्याच्या मागावर होते. साळवे सांगाेला परिसरातील निजामपूर गावात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. साळवे याला कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक गणेश फरताडे, पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारु, मारुती पारधी, अमोल काटकर, संदीप शेळके, शौकत शेख, कैलास लिम्हण, पुरुषोत्तम गुन्ला यांनी ही कारवाई केली.
























