आपटे रस्त्यावरील हाॅटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

उद्योजकाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली आत्महत्या

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती आपटे रस्त्यावरील एका हाॅटेलमधील खोलीत उद्योजकाचा मृतदेह आढळला. उद्योजकाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अशोक मिलापचंद जैन (वय ६१, रा. लोढा पार्क, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) असे मृतावस्थेत सापडलेल्या उद्योजकाचे नाव आहे.

ज्येष्ठ कुस्तीसंघटक अण्णासाहेब पठारे यांचे निधन – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जैन हे शुक्रवारी दुपारी घरातून बाहेर पडले. सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार स्वारगेट पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, शनिवारी दुपारी आपटे रस्त्यावरील एका हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी डेक्कन पोलिसांशी संपर्क साधला. हाॅटेलमधील खोलीचा दरवाजा बंद असून, आतमध्ये असलेल्या व्यक्तीकडून प्रतिसाद दिला जात नाही, अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्यातील कर्मचारी हाॅटेलमध्ये पोहोचले.

पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा जैन हे खोलीत बेशुद्धावस्थेत पडले होते. पोलिसांनी ओळख पटविल्यानंतर जैन यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ‘जैन यांनी विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्युमागचे निश्चित कारण समजेल’, असे डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले.
पोलिसांनी हाॅटेलमधील खोलीची पाहणी केली. खोलीत एक चिठ्ठी सापडली आहे. जैन यांनी चिठ्ठीत आर्थिक समस्यांबाबत उल्लेख केला आहे. नातेवाईकांच्या मदतीने चिठ्ठीची पडताळणी करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×