Breking News
विशेष वृत्त – साथी पोर्टल: बियाण्यांच्या पारदर्शकता, गुणवत्ता व विश्वासार्हतेकडे डिजिटल पाऊलदुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूबंगल्यातून २७ लाखांचे दागिने लंपास‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील शिवराज मोटेगावकर यांची चौकशी‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात मनीषा मांढरेला ‘सीबीआय’ कोठडीदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जापैशाच्या वादातून वडिलांनीच मुलावर अ‍ॅसिड फेकलेपुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयेवलेवाडी परिसरात चिमुरडीवर अत्याचारपुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

आजारी आत्याला बघण्यासाठी जेलमधून पळाला

आरोपीला भवानी पेठेतून अटक

marathinews24.com

पुणे – आजारी आत्याला भेटण्यासाठी बंदीवानाने खुल्या जेलमधून पलायन केल्याची कबुली दिली आहे. ही घटना १२ मे रोजी घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट एकने आरोपीला भवानी पेठेतून अटक केली आहे. जर्नादन शंकर अडसुळे (वय ३५ रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीने २०१७ मध्ये खून केल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.

जनगणना कार्यक्रमास अनुपस्थिती अंगलट – सविस्तर बातमी

खुल्या कारागृहातून वैâद्याने पलायन केल्यानंतर त्याच्या शोधार्थ पोलीस काम करीत होते. त्याचेवळी गुन्हे शाखा एकमधील अमलदार अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, उमेश मठपती, नीलेश साबळे, अविनाश दळवी हे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी अमलदार अनिकेत बाबर व उमेश मठपती यांना आरोपी भवानी पेठेत आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने आरोपी जर्नादन अडसुळे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आजारी आत्याला भेटण्यासाठी आल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, एसीपी शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×