Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

जनगणना कार्यक्रमास अनुपस्थिती अंगलट

७ शिक्षकांसह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – केद्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या जणगणना २०२७ कार्यक्रमास अनुपस्थिती लावणाऱ्या एका शाळेतील सात शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड पी. व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटक – सविस्तर बातमी

याबाबत फुरसुंगी नगरपरिषदेचे कर अधिकारी आबाासाहेब दादासाहेब मुढे (वय ३०) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सात शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जणगणना २०२७ च्या कार्यक्रमासाठी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांतील कर्मचारी, तसेच ‘आशा वर्कर’ यांची प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत २३ ते २५ एप्रिल दरम्यान उरळी देवाची नगरपरिषद कार्यालयात जनगणना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. फुरसुंगीतील वाॅलनेट स्कूलमधील शिक्षकांसह सात जणांना प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, संबंधित शिक्षक आणि कर्मचारी पूर्वपरवानगी न घेता अनुपस्थित राहिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जनगणना अधिनियम १९४८ कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×