Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

प्राचार्याकडून खंडणी उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह दोघे अटकेत

महिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआड

दोन पोलिसांना अटक, महिला शिपाई फरार

marathinews24.com

पुणे – बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात (पोक्सो) गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून खंडणी उकळणारा पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस कर्मचारी सुदाम तायडे यांना गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणात महिला पोलीस शिपाई सोनाली हिंगे पसार झाली असून, तिचा शोध घेण्यात येत आहे.

आजारी आत्याला बघण्यासाठी जेलमधून पळाला – सविस्तर बातमी

नामवंत महाविद्यालयातील प्राचार्यांविरुद्ध बाल लौंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक बडे, तायडे, हिंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित युवतीची शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकातील पोलीस शिपाई हिंगे हिच्याशी एका व्यायामशाळेत (जीम) ओळख झाली होती. नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष तिने युवतीला दाखविले होते. त्यानंतर या युवतीला जाळ्यात ओढून बडे, हिंगे, तायडे यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना धमकावले होते. युवतीला त्यांनी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला नाही. तिने महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. मात्र, संबंधित महाविद्यालयातील प्रवेशही रद्द झाला होता. अखेर पीडित युवतीने याबाबतची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली. तिच्यासोबत तिचे कुटुंबीय होते. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. या प्रकरणात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तिघांना पोलीस दलातून बडतर्फ केले होते.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघे जण पसार झाले हाेते. तिघांचा गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत होता. गुन्हे शाखेच्या युनिट दोनने बडे आणि तायडे यांना शुक्रवारी अटक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×