Breking News
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात मनीषा मांढरेला ‘सीबीआय’ कोठडीदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जापैशाच्या वादातून वडिलांनीच मुलावर अ‍ॅसिड फेकलेपुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयेवलेवाडी परिसरात चिमुरडीवर अत्याचारपुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पणबिबवेवाडीत मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रयगांजा विक्री करणारे रिक्षाचालक गजाआडआपुलकी कर्करोग रूग्णालयाचा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोयत्याचा धाक दाखवून दाम्पत्याला शिवीगाळ, आरोपीला अटक

शंभरहून अधिक गुन्हे केलेल्या सराईताला बेड्या; अलंकार पोलिसांची कारवाई

पुणे, कोल्हापूर ते संभाजीनगरपर्यंत गुन्ह्यांचे जाळे

marathinews24.com

पुणे – शहरासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला अखेर अलंकार पोलिसांनी जेरबंद केले. कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या या आरोपीकडून तब्बल 12 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजू बाबूराव जावळकर (वय 57, रा. डोणजे फाटा, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कारफोडीच्या घटना वाढल्या होत्या. रस्त्याच्या कडेला व निर्जन ठिकाणी उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दागिने, रोख रक्कम व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डल्ला मारला जात होता.

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला शोक – सविस्तर बातमी

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा माग काढला. ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सहा गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीकडून 97.200 ग्रॅम सोन्याचे दागिने, ॲपल कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली ज्युपिटर मोपेड असा एकूण 12 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर पुणे शहर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात शंभरहून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलिस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम, पोलिस निरीक्षक स्मिता पाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर तसेच पोलिस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, माधुरी कुंभार, राकेश क्षीरसागर, शिवाजी शिंदे, आशीष राठोड व विशाल मोरे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×