दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – गुंतवणुकीवर दरमहा २० टक्के परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिक महिलेची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अतुल शामराव पवार (सध्या रा. नऱ्हे, सिंहगड रस्ता, मूळ रा. नांदवळ, जि. सातारा), संतोष सुरेश काकडे (रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कंपनीत गुंतवणूकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५० वर्षीय महिला व्यावसायिक आहे. तक्रादार महिला ऑनलाइन पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री करतात. तक्रारदार महिला लोणी काळभोर भागात राहायला होत्या. २०२० मध्ये आरोपींशी महिलेच्या पतीची ओळख झाली. आरोपी अतुल पवार याने त्याचा मित्र संतोष काकडे याचा पुणे मेट्राशी करार झाल आहे. व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करुन दिल्यास दरमहा २० टक्के परतावा देण्याचे आमिष त्यांनी महिलेला दाखविले.
सुरुवातीला महिलेने गुंतवणूक करण्यास नकार दिला. आरोपींनी महिलेच्या पतीवर दबाब आणला. त्यानंतर महिलेने २० लाख रुपये गुंतविले. त्यानंतर आरोपींनी सुरुवातीला चार महिने दरमहा एक लाख रुपये परतावा दिला. त्यानंतर आरोपींनी परतावा, तसेच गुंतवलेली रक्कम दिली नाही. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक बोराटे तपास करत आहेत.





















