शेतीला पाणी देण्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला

शेतीला पाणी देण्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला

लोणीकंद परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – शेतीला पाणी देण्याच्या वादातून एकावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गावात घडली. जालिंदर नामदेव नागवडे (वय ६१, रा. वाडेबोल्हाई, पुणे-अहिल्यानगर रस्ता, ता. हवेली ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी नागवडे यांचा चुलतभाऊ सुधीर सुरसिंग नागवडे (वय ४३, रा. शिरसवाडी, वाडेबोल्हाई, पुणे-अहिल्यानगर रस्ता, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जालिंदर नागवडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून ५ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडेबोल्हाईतील शिरसवाडीत नागवडे कुटुंबीयांची शेतजमीन आहे. जालिंदर यांची विहीर आहे. जालिंदर हे पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपीने माझ्या जागेत यायचे नाही, असे सांगून जालिंदर यांना शिवीगाळ केली. आरोपीने झाडाला लटकवलेली कुऱ्हाड उगारली. कुऱ्हाडीचा दांड्याने त्यांना मारहाण केली. दांडा मारल्याने जालिंदर यांच्या मनगटाला दुखापत झाली. आरोपीने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे तपास करत आहेत.

गुलटेकडीत तरुणावर शस्त्राने वार

भावाला शिवीगाळ केल्याच्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तरुणासह अल्पवयीन साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. अनिकेत सुरेश गाडे (वय १८, रा. डायस प्लाॅट, गुलटेकडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ओम वैद्य (वय १९) याच्यासह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडे याने आरोपी वैद्य याच्या लहान भावाला शिवीगाळ केली होती. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाले होते. २२ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास आरोपी आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराने गाडे याच्यावर शस्त्राने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×