चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – विमा सेटलमेंटमधून बोलत असल्याचे सांगून बंद झालेल्या पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल १७ लाख १२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना फेबु्रवारी २०२४ ते २५ ऑगस्ट २०२५ कालावधीत पाषाण रोड पंचवटी परिसरात घडली आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय व्यक्तीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिकाच्या फ्लॅटमधून ५ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पाषाण रोड परिसरात राहायला असून, ९ फेब्रुवारी २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क साधला. विमा सेटलमेंटमधून बोलत असल्याची बतावणी करीत त्यांची बंद झालेल्या पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याची बतावणी सायबर चोरट्यांनी केली. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित करून तब्बल १७ लाख १२ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने नुकतीच फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार याप्रकरणी पोलीस निरीक्षक शीतल जाधव तपास करीत आहेत.
पेन्शन कार्डच्या नावाखाली १० लाखांना गंडा
पेन्शन कार्ड बनवून देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला तब्बल १० लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना १३ ते २० मार्च २०२६ कालावधीत महमंदवाडीत घडली आहे. याप्रकरणी ६८ वर्षीय नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे महमंदवाडीत राहायला असून, १३ ते २० मार्च कालावधीत सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला संपर्क साधला होता . त्यांना पेन्शनकार्ड बनवून देण्याची बतावणी करीत १० लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी अण्णासाहेब बाबर तपास करीत आहेत.





















