Breking News
डीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषण

मोटारीखाली सापडून तरुणाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडीत अपघात

marathinews24.com

पुणे – दारू प्याल्यानंतर झालेल्या वादातून एकाला रस्त्यावर ढकलल्याने मोटारीच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटनाा सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडीत घडली. याप्रकरणी दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी मोटार चालकासह दाेघांविरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

खराडीत मुलीसोबत वाद, टोळक्याकडून वाहनांची तोडफोड – सविस्तर बातमी

विठ्ठल भाऊराव जाधव (वय ३७, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, खडकवासला) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धू शामराव धोत्रे (वय ३६,रा. किरकटवाडी, खडकवासला) मोटार चालक गौरव आतिश काळभोर (वय ३२, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) यांना अटक करण्यात आली. याबाबत गजानन भाऊराव जाधव (वय ३५, रा. खोपडी बुद्रुक, ता. दारवा, जि. यवतमाळ) याने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल जाधव आणि आरोपी धोत्रे यांना दारू पिण्याचे व्यसन आहे. दोघे मजुरी करतात. २६ मे रोजी दुपारी सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडीतील देशी दारू गुत्त्यावर दारू प्यायले. दारू प्याल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. धोत्रेने वादातून जाधवला मारहाण केली आणि त्याला रस्त्यावर ढकलून दिले. जाधव रस्त्यात पडल्यानंतर खडकवासल्याकडे निघालेल्या मोटारीच्या चाकाखाली सापडून जाधव याचा मृत्यू झाला. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे यांनी दिली. उपनिरीक्षक कसबे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×