Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ एकाचा खून

धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ एकाचा खून

सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील सातारा रस्त्यावरील श्री शंकर महाराज उड्डाणपुलाजवळ एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आल्याची घटना घडली. खून झालेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई आकाश कीर्तीकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डिजिटल ॲरेस्टची भीती दाखवली; ज्येष्ठाची २१ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावर श्री शंकर महाराज उड्डाणपुलाजवळील भुयारी मार्गात एकाच्या डाेक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (११ जुलै) मध्यरात्री घडली. सकाळी एक जण भुयारी मार्गात गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती सहकारनगर पाेलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विट्ठल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथे रक्ताने माखलेला सिमेंटचा गट्टू, फरशी सापडली. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

पोलिसांकडून खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तो फिरस्ता असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसंनी या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस निरीक्षक संतोष जाधव तपास करत आहेत.

वैमनस्यातून तरुणाला मारहाण

वैमनस्यातून तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना कोथरूड भागात घडली. टोळक्याने दहशत माजवून मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना धमकाविल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आनंद शरद कुलकर्णी (वय २६, रा. विश्वश्री सोसायटी, कोथरूड) याने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रसाद उर्फ मुन्ना भगवान मोरे (रा. गुजरात काॅलनी, कोथरूड), संयम यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. १० जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास आरोपींनी कुलकर्णी याला गुजरात काॅलनी परिसरात अडवले. त्याला शिवीगाळ केली. त्यलाा स्टम्प, फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. आरडाओरडा ऐकून नागरिक तेथे जमा झाले. नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×