Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

डिजिटल ॲरेस्टची भीती दाखवली; ज्येष्ठाची २१ लाखांची फसवणूक

पोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बँक खात्याचा वापर काळ्या पैसे व्यवहारात झाला असून, या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारीची काच फोडून रोकड चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे बंडगार्डन रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली होती. ‘ज्येष्ठ नागरिकाच्या नावे बँकेत बनावट खाते उघडण्यात आले आहे. या खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारात झाला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अटकेची (डिजिटल ॲरेस्ट) कारवाई करण्यात येणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील’, अशी भीती सायबर चोरट्यांनी त्यांना दाखविली होती. बँक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी एका खात्यात तातडीने २१ लाख रुपये जमा करावे लागतील, असेही सांगण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबा पोटे तपास करत आहेत.

‘ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची फसवणूक

ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची चार लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोंढव्यातील लुल्लानगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगले पैसे मिळतात, असे आमिष दाखविले होते. महिलेला सुरुवातीला एक काम देण्यात आले. या कामाचे पैसे महिलेच्या खात्यात जमा करण्यात आले. परतावा मिळाल्यानंतर महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने चार लाख ३१ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर तिला परतावा देण्यात आला नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले तपास करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×