Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

म्हात्रे पूल येथील ओपन जिम कामासंदर्भात समाज माध्यमावर प्रसारित माहिती तथ्यहीन

म्हात्रे पूल येथील ओपन जिम कामासंदर्भात समाज माध्यमावर प्रसारित माहिती तथ्यहीन

जिल्हा सह आयुक्त मच्छिंद्र घोलप यांची माहिती 

marathinews24.com

पुणे – पुणे महानगरपालिका क्षेत्रातील म्हात्रे पूल परिसरात ओपन जिम उभारण्याच्या कामाचा समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये विकासकामाच्या माहिती फलकावरील माहितीचा चुकीचा अर्थ लावून संबंधित कामाबाबत तसेच शासनाच्या निधीबाबत दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. या माहिती वस्तुस्थितीशी विसंगत असून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे, अशी माहिती नगरपालिका प्रशासन शाखेचे -जिल्हा सह आयुक्त मच्छिंद्र घोलप यांनी दिली आहे.

अमृत-सक्षम उपक्रमातून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजकतेची सुवर्णसंधी – सविस्तर बातमी 

समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये प्रभाग क्र. 13 मधील ‘म्हात्रे पूल रिलायन्स मॉल शेजारी ओपन जिम बसविणे’ या विकासकामाचा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित कामास रु. 9,80,744/- (अक्षरी रुपये नऊ लाख ऐंशी हजार सातशे चव्वेचाळीस फक्त) इतकीच प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आलेली असून, कामाची मंजूर किंमत याच मर्यादेत आहे.

मात्र, कामाच्या फलकावर नमूद असलेल्या “42170541” या क्रमांकाचा चुकीचा अर्थ लावून, या एकाच कामासाठी 42 कोटी रुपये अथवा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असा दावा समाज माध्यमावर करण्यात येत आहे. हा दावा पूर्णतः चुकीचा व वस्तुस्थितीविरुद्ध आहे.

वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे :

‘42170541’ हा निधीचा आकडा नसून शासकीय लेखाशीर्ष (Budget Head) आहे. शासनाच्या अर्थसंकल्पीय व लेखा प्रणालीमध्ये प्रत्येक विभाग, योजना किवा खर्चाच्या प्रकारासाठी स्वतंत्र सांकेतिक क्रमांक (लेखाशीर्ष) निर्धारित करण्यात आलेला असतो. संबंधित कामासाठी नमूद केलेले “4217 0541” हे नगर विकास विभागाचे अधिकृत लेखाशीर्ष असून, तो केवळ लेखावर्गीकरणासाठी वापरला जाणारा तांत्रिक क्रमांक आहे. त्याचा कोणत्याही कामाच्या मंजूर रकमेशी अथवा खचांशी संबंध नाही.

संबंधित कामाची मंजूर किंमत रु. 9,80,744 इतकीच आहे. म्हात्रे पूल परिसरात ओपन जिम उभारण्याच्या कामासाठी केवळ 9,80,744 रुपये इतकाच निधी मंजूर करण्यात आला असून, त्यानुसारच कामाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रचलित शासन नियमांनुसार ई-निविदा प्रक्रियेद्वारे पूर्ण पारदर्शकतेने करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय लेखाशीर्षाचा चुकीचा अर्थ लावून कोट्यवधी रुपयांच्या मंजूरीबाबत करण्यात येत असलेला प्रचार हा वस्तुस्थितीविरुद्ध, दिशाभूल करणारा व तथ्यहीन आहे, अशी माहिती श्री. घोलप यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×