‘एटीएस’कडून पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात छापे
marathinews24.com
पुणे – पाकिस्तानातील गुंड, दहशतवादी कारवाईत गुंतलेला गुंड शहजाद भट्टी याच्या टोळीशी संबंधित ६६ जणांची राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केली. एटीएसने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात कारवाई करुन चौकशीसााठी काहीजणांना ताब्यात घेतले.
सहकारनरमध्ये टोळक्याची दहशत; मोटारींची तोडफोड – सविस्तर बातमी
एटीएसच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली. शहजाद भट्टी, त्याचे साथीदार अमजल गुज्जर, अबिट जाट, राणा हुसेन, अब्दुल मेनन, मुन्ना झिंगाडा, फारूख खोकर, जाफर सुपारी, सनी टायगर, शेख सलमान, सर्फराज डोंगर उर्फ जोरासिंग, अबू मुसा, सरकार हे समाज माध्यमातून काही तरुणांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. देशभरातील तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करत होता. त्यासाठी तो समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करत होता. एटीएसच्या पथकाने त्याअनुषंगाने १० जुलै रोजी पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यभरात २०० ठिकाणी छापे टाकले. ‘त्याअनुषंगाने एटीएसच्या पथकाने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यात तपास केला. शहजाद भट्टी आणि त्याच्या टोळीतील सराइतांच्या संपर्कात असलेल्या ६६ जणांची मंगळवारी (१४ जुलै) चौकशी केली. एटीएसच्या पथकाने वेगवेगळ्या भागात छापे टाकले. या प्रकरणात काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, ’, अशी माहिती‘एटीएस’ मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पाकिस्तानी गुंड भट्टी आणि त्याचे साथीदार देशभरातील तरुणांशी समाज माध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर करुन त्यांच्या संपर्कात होते. त्याांना संदेश पाठविणे, तसेच गु्न्हेगारीचे उद्दात्तीकरण करणारे संदेश पाठविण्यात येत होते. तरुणांना देशविघातक कारवाईसाठी भट्टी आणि साथीदार प्रवृत्त करत होते. अशा तरुणांची चौकशी करुन त्यांना भट्टी आणि साथीदारांच्या विळख्यातून सोडविणे, तसेच गंभीर बाब आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी चौकशी करण्यात आली, असे एटीएसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
























