Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतूक बदल

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतूक बदल

सारसबाग परिसरातील वाहतूक बंद

marathinews24.com

पुणे – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) सारसबाग परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. सारसबाग परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. ‘सारसबाग परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. सारसबाग परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यापार्श्वभूमीवर शनिवारी (१ ऑगस्ट) सकाळपासून सारसबाग परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.

कोयना धरण “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नावाने ओळखले जाणार – सविस्तर बातमी 

या भागातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे. सारसबाग परिसरातील बंद राहणारे रस्ते आणि पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे

– देशभक्त केशवराव जेधे चौक ते सारसबाग (सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकातून मित्रमंडळ चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून सिंहगड रस्त्याकडे जावे)

– जेधे चौकातील उड्डाणपुलावरुन सारसबागेकडे जाण्यास बंदी (कात्रजकडून येणाऱ्या वाहनचालकांनी उड्डाणपुलावरुन न जाता मित्रमंडळ चौकातून सिंहगड रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे)

– स्वारगेट परिसरातील व्हेगा सेंटर ते सारसबागपर्यंतचा समतल विलगक (ग्रेट सेपरेटर) वाहतुकीस बंद (वाहन चालकांनी घोरपडे पेठ, राष्ट्रभूषण चौक, हिराबाग, बाजीराव रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे)

– सारसबागेज‌ळील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते पूरम चौक वाहतूक बंद (स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, सिंहगड रस्ता, दांडेकर पूल चौकमार्गे इच्छितस्थळी जावे)

– दांडेकर पूल, सिंहगड रस्त्यावरुन सारसबागेकडे जाणारी वाहतूक बंद (दांडेकर पूल, नाथ पै चौक, ना. सी. फडके चौक, कल्पना हाॅटेलमार्गे टिळक रस्ता, बाजीराव रस्त्याकडे जावे)

– पूरम चौक ते जेधे चौक दरम्यान एकेरी वाहतुकीचे नियम तात्पुरते शिथिल

– दांडेकर पूल ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक दरम्यानची एकेरी वाहतूक गरज भासल्यास दुहेरी

– नीलायम चित्रपटगृहाकडून सारसबागेकडे येणारी वाहतूक पर्वती गावातून छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक गरज भासल्यास वळविण्यात येणार

– शंकरशेठ रस्ता ते सारसबाग दरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गाने

– मित्रमंडळ चौकातील पाटील प्लाझा परिसरात वाहने लावावीत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×